केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना धक्का
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, ६ फेब्रुवारी २०२४
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्ष नेमका कोणाचा हा वाद निवडणूक आयोगाकडे पोहोचला होता. याप्रकरणी आता निवडणूक आयोगाने आपला निर्णय जाहीर केला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचे चिन्ह हे शरद पवार यांचे नसून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे असल्याचा निकाल ६ फेब्रुवारी रोजी दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयात पुढीलप्रमाणे नमूद केले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णयाचे स्वागत केले आहे.
आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत!
श्री. अजित पवार,
राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष@AjitPawarSpeaks— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) February 6, 2024
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचे भाजपनेही स्वागत केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
आमच्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच घड्याळ चिन्ह म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली, मी त्यांचे, सर्व सहकारी तसेच कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.@AjitPawarSpeaks @mahancpspeaks
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 6, 2024
दरम्यान, काँग्रेसने हा निर्णय अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याप्रकरणी केंद्र सरकारव टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय केंद्र सरकारने लिहून दिलेला आहे, निवडणूक आयोगाने तो फक्त जाहीर केला.
काही महिन्यांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देशात एकही प्रादेशिक पक्ष अस्तित्वात राहणार नाही असे म्हटले… pic.twitter.com/d0XdbV6YlQ
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 6, 2024
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाची संपूर्ण प्रत
NCP- party name and symbol dispute- ECI Final Order 06.02.2024
========================================================
========================================================