पनवेलमध्ये आज काही भागात वीज नाही

नवी मुंबई, 10  जानेवारी 17/AV News Bureau :

महावितरण कंपनीच्या पनवेल विभागातील २२ के.व्ही. भिंगारी १ व २ या वीज वाहिनीच्या दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या वीज वाहिनीवरून होणारा वीजपुरवठा मंगळवार १० जानेवारी रोजी बंद ठेवण्यात येणार आहे.

२२ के.व्ही. भिंगारी १ व २ या वीज वाहिनीवरून पनवेल-१, साईनगर (जवाहर) गव्हाण पनवेल-३, नेरे ,पारगांव, कार्नाळा, कोळखा आदी परिसराला वीज पुरवठा करण्यात येतो. मात्र दुरूस्तीच्या कामामुळे या वीज वाहिनीवरून होणारा वीज पुरवठा सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.