- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, १० डिसेंबर २०२३
मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यांमधील चलन आव्हानांना सामोरे जाण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. यामध्ये एक्झिक्युटिव्ह कोचमधील शौचालयांसाठी गंध सेन्सर्स प्रायोगिक तत्त्वावर लावण्यात आले आहेत.
स्वच्छतेच्या दृष्टीने आणि प्रवाशांच्या समस्यांना तत्काळ प्रतिसाद देण्याच्या हेतूने एक सक्रिय पाऊल म्हणून, मध्य रेल्वेने वंदे भारत एक्स्प्रेसच्या एक्झिक्युटिव्ह कोचच्या शौचालयांमध्ये गंध सेन्सर्स सुरू केले आहेत. हे सेन्सर्स चाचणीच्या आधारावर तैनात केलेले आहेत आणि शौचालयाच्या वातावरणातील सततच्या गंध पातळीचे परिक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. वासाच्या तीव्रतेत वाढ झाल्याचे आढळून आल्यावर, सेन्सर्स हाऊसकीपिंग कर्मचार्यांना इशारा संदेश त्वरीत पाठवतो.
हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांना कोणत्याही माहिती प्राप्त झालेल्या भागात त्वरित उपस्थित राहण्यासाठी याची मदत होते, स्वच्छता मानके सुस्थितीत राखण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी ही योजना जलद कारवाई होण्याची सुनिश्चित करते. चाचणीच्या यशस्वी कालावधीनंतर, हे गंध सेन्सर्स इतर सर्व गाड्यांच्या डब्यांमध्ये हळूहळू बसविण्यात येणार आहेत, ज्यामुळे संपूर्ण ट्रेनमध्ये प्रवाशांच्या स्वच्छ व सुखकर प्रवासासाठी मदत होईल,अशी आशा रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.
========================================================
========================================================