“Mumbai Toilet Locator App” लोकांच्या सेवेत

मुंबईतील शौचालये शोधण्यासाठी महापालिकेचे ऍन्ड्रॉईड अॅप

मुंबई, 9 जानेवारी 17 /AV News Bureau :

मुंबईतील शौचालये कुठे कुठे आहेत, याचा मागोवा घेण्यासाठी मुंबई महापालिकेने शौचालय शोधणारे “Mumbai Toilet Locator App” हे’ऍन्ड्रॉईड अॅप’ तयार केले आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील ८०० सशुल्क सार्वजनिक शौचालये सध्या या अॅपला जोडण्यात आली आहेत. या अॅपचे अनौपचारिक उद्धाटन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते आज करण्यात आले.

या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय देशमुखउपायुक्त (घन कचरा व्यवस्थापनविजय बालमवारउपायुक्त (आयुक्त कार्यालयरमेश पवारघन कचरा व्यवस्थापन खात्याचे प्रमुख अभियंता सिराज अन्सारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

  1. “Mumbai Toilet Locator App” हे ऍन्ड्रॉईडअॅप गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध

image_mumbai-toilet-locator-app-04

  1. गुगल प्ले स्टोअरवर”Mumbai Toilet Locator App” या नावाने सर्च करुन हेअॅप आपल्या ऍन्ड्रॉईड स्मार्ट फोनवर सहजपणे डाऊनलोड व इन्स्टॉल करता येणार आहे.
  2. हेअॅप आपल्या भ्रमणध्वनीवर डाऊनलोड व इन्स्टॉल केल्यावर जीपीएस (Global Positioning System) च्या सहाय्याने आपण ज्या भागात असू त्या भागातील जवळचे शौचालय, तिथे जाण्याचा मार्ग व आपण असलेल्या ठिकाणापासूनचे अंतर देखील या अॅप वर दर्शविले जाणार आहे.
  3. याअॅपशी जोडलेल्या प्रत्येक शौचालयाचे छायाचित्र देखील अॅपद्वारे दर्शविले जाणार आहे. ज्यामुळे शौचालय शोधणे अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांपैकी एक असलेल्या मुंबई महानगरी मध्ये दररोज हजारो पर्यटक वा नागरिक मुंबईला भेट देण्यासाठी येत असतात. तसेच लाखो मुंबईकरही दररोज कामानिमित्त घराबाहेर पडत असतात.  महापालिकेच्या या अॅपमुळे नागरिकांना जवळच्या शौचालयांची माहिती त्वरीत उपलब्ध होईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.