भारतीय तटरक्षक दलाचा उपक्रम
नवी मुंबई,9 जानेवारी 17/AV News Bureau :
भारतीय तटरक्षक हॉवरक्राफ्ट प्रचलन क्षेत्र,नवी मुंबईतर्फे मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरातील मच्छीमार बांधवांसाठी नुकतेच एक सागरी सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
मच्छीमार बांधवांना सागरी सुरक्षेच्या दृष्टीने काय काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
- मच्छीमार बांधवांनी आपल्या बोटीमध्ये लाईफ जॅकेट, डॅट (Distress Alert Transmitter), नेहमी सोबत ठेवावे.
- मच्छीमार रात्रीच्या वेळी मासेमारी करताना लाइटबंद ठेवतात. त्यामुळे अपघाताची शक्यता असते.
- एखादे अनोळखी जहाज किंवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ त्याची माहिती लगतच्या पोलीस ठाण्यात किंवा कोस्ट गार्डला द्यावी. समुद्रमार्ग होणारे दहशतवादी हल्ले आणि इतर संशयास्पद हालचाली रोखण्यासाठी मच्छीमारांनी सहकार्य करावे.
- मच्छीमारांनी तात्काळ संपर्कासाठी कोस्ट गार्डच्या 1554 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा.
- मासेमारी करताना बोटीला कलरकोड असणे महत्वाचे आहे.
- मच्छीमारांनी मासेमारी करताना परवाना, ओळखपत्र सोबत ठेवावे. सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने कलरकोड, परवाना व ओळखपत्र असणे, हे महत्वाचे असते.
या कार्यक्रमात मच्छीमारांना सागरी सुरक्षितेतच्या दृष्टीने कशी काळजी घ्यावी याबाबतचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. या कार्यक्रमास भारतीय तटरक्षक दलाचे अधिकारी व कर्मचारी तसेच मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरातील मच्छीमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.