18 वर्षावरील नागरिकांसाठी इन्कोव्हॅक लसीचा कोविड प्रिकॉशन डोस

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 3  नोव्हेंबर 2023

 राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कोविड लसीकरण कार्यक्रमांतर्गत नाकावाटे घ्यावयाचा इन्कोव्हॅक लसीचा समवेश करण्यात आला आहे. सदर लसीकरण एप्रिल 2023 पासून सुरु करण्यात आले होते. परंतु इन्कोव्हॅक लस ही 60 वर्षावरील नागरिक हे सहव्याधी असल्याने ते अतिजोखमीचे असल्यामुळे प्रथमतः प्रिकॉशन डोस म्हणून सुरु करण्यात आली होती.सदर लसीकरणासाठी पात्र नवी मुंबईकरांनी इन्कोव्हॅक लसीचा प्रिकॉशन डोस घ्यावा व कोविड आजारापासून संरक्षित व्हावे असे आवाहन नमुंमपा आयुक्त  राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

बातमी वाचा : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच विकासकामे वेळेत पूर्ण करा

सद्यस्थितीत सर्व वयोगटातील नागरिकांकडून प्रिकॉशन डोसबाबत मागणी असल्याने 18 वर्षावरील सर्व नागरिकांना इन्कोव्हॅक लस देण्याबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 पासून 18 वर्षावरील नागरिकांना लसीकरणास सुरवात करण्यात आलेली आहे.

नाकावाटे दिली जाणारी ही पहिलीच कोरोना प्रतिबंधक लस आहे. या लसीमुळे पेशींच्या रोगप्रतिकार क्षमतेत वाढ होणार असून थेट स्नायूमध्ये इंजेक्शन न देताच ही लस दिली जात असल्याने सुरक्षा देणारी आहे.

बातमी वाचा : अनुभवी अधिकारी, कर्मचारी यांची सेवानिवृत्ती ही एक प्रकारे संस्थेची हानी – आयुक्त नार्वेकर

ही लस प्रिकॉशन डोस म्हणून दिली जात असून कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर 6 महिने पूर्ण झालेले लाभार्थी हे प्रिकॉशन डोसकरिता पात्र असतात. ही लस नवी मुंबई महानगरपालिकेची वाशी, नेरुळ व ऐरोली येथील सार्वजनिक रुग्णालयात सकाळी 9 ते संध्याकाळी 5 यावेळेत उपलब्ध असणार आहे. हा डोस घेण्यासाठी दुसरा डोस घेतल्याचा पुरावा सोबत‍ असणे आवश्यक आहे.

======================================================

========================================================