मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांची माहिती

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 23, ऑक्टोबर 023

भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. सुधारित वेळापत्रकाप्रमाणे संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासंदर्भात मान्यताप्राप्त राजकीय पक्षांकडून नेमण्यात आलेल्या मतदान केंद्रस्तरीय सहाय्यक (बीएलए) यांना उपस्थित राहण्याबाबत राजकीय पक्षांना कळविण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक  अधिकारी अशोक शिनगारे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी कळविले आहे.

भारत निवडणूक आयोगाकडील पत्र २९ मे २०२३ अन्वये १ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला असून सदर कार्यक्रमामध्ये भारत निवडणूक आयोगाने दि.२५ सप्टेंबर२०२३ व मा.मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी २६ सप्टेंबर २०२३ व १९ ऑक्टोबर, २०२३ रोजीच्या पत्रान्वये खालील बाबीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

बातमी वाचा : अंदमान समुद्रातील ज्वालामुखी आर्क ऑफ-निकोबारबाबत संशोधन

या सुधारित कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे करण्यात येणार असल्याने या कार्यक्रमासाठी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांकडून नेमण्यात आलेले मतदान केंद्रस्तरीय सहाय्यक (BLA) यांना उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यासाठी या जिल्ह्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांना कळविण्यात आलेले आहे.  विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारीत वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

बातमी वाचा : वर्तमानपत्र गुंडाळलेले अन्नपदार्थ का खावू नये

पूर्व पुनरिक्षण उपक्रम

मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करणे, मतदार यादीतील व मतदार ओळखपत्रातील तफावत दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करुन मतदार यादीत सुधारणा करणे, विभाग / भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्रांच्या सीमांचे पुनर्रचना तयार करून मतदान केंद्रांच्या यादीला मान्यता घेणे, तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबद्ध योजना आखणे, नियंत्रण सारणीचे अद्ययावतीकरण करणे – दि. २२ ऑगस्ट २०२३ (मंगळवार) ते दि.९ ऑक्टोबर २०२३.

नमुना १-८ तयार करणे, ०१ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित प्रारूप यादी तयार करणे – कालावधी – दि. १० ऑक्टोबर २०२३ (मंगळवार) ते दि. २६ऑक्टोबर २०२३ (गुरूवार).

पुनरिक्षण उपक्रम

एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे – कालावधी – २७ ऑक्टोबर २०२३ (शुक्रवार)

दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी – २७ ऑक्टोबर २०२३ (शुक्रवार) ते ९ डिसेंबर २०२३ (शनिवार).

विशेष मोहिमांचा कालावधी – ४ नोव्हेंबर, २०२३ (पहिला शनिवार) व ५ नोव्हेंबर, २०२३ (पहिला रविवार) तसेच २५ नोव्हेंबर, २०२३ (चौथा शनिवार) व २६ नोव्हेंबर, २०२३ (चौथा रविवार)

दावे व हरकती निकालात काढणे. कालावधी – २६.१२.२०२३ (मंगळवार).

अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई – कालावधी १.०१.२०२४ (सोमवार).

मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करणे. कालावधी – ५ जानेवारी २०२४ (शुक्रवार). ‍

========================================================

========================================================