नवी मुंबई विमानतळ बाधितांसाठी सिडकोतर्फे भूखंडाचा ताबा दिल्यापासून ६ वर्षांचा बांधकाम कालावधी मंजूर

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 19 ऑक्टोबर 2023

सिडकोच्या प्रचलित धोरणानुसार पुनर्वसन आणि पुन:स्थापना योजनेंतर्गत सिडको प्रकल्पबाधितांना वाटप करण्यात आलेल्या भूखंडांवर बांधकाम करण्यासाठी भूखंड ताब्यात दिल्यापासून ६ वर्षांचा बांधकाम कालावधी मंजूर करण्यात आला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधितांसाठी सिडकोच्या  या नव्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

बातमी वाचा : अंदमान समुद्रातील ज्वालामुखी आर्क ऑफ-निकोबारबाबत संशोधन

  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधित देत असलेले योगदान लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार विशेष बाब म्हणून बांधकाम पूर्ण करण्याकरिता या प्रकल्पबाधितांना भूखंडाचा ताबा दिल्यापासून ६ वर्षांचा कालावधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे प्रकल्पबाधितांना सुलभतेने भूखंडाचा विकास करता येणार आहे.

अनिल डिग्गीकर, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

बातमी वाचा : निवडणुकीचे पडघम वाजले; पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

प्रचलित धोरणानुसार बांधकाम कालावधी हा करारनामा झाल्याच्या दिनांकापासून गणला जातो. परंतु नवीन ठरावानुसार आता भूखंडाचा ताबा दिल्याच्या तारखेपासून पुढील ६ वर्षांच्या कालावधीत विमानतळ प्रकल्पबाधितांना बांधकाम पूर्ण करता येणार आहे.

हा ६ वर्षांचा कालावधी हा बांधकाम पूर्ण करण्याकरिता वैध असल्याने भूधारकांना विहित मुदतीपर्यंत बांधकाम मुदतवाढीसाठी अर्ज करण्याची आवश्यकता असणार नाही. मात्र हा ६ वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर बांधकाम पूर्णत्वास गेले नसल्यास, भूधारकांना नियमानुसार बांधकाम कालावधी वाढवून घेणे व बांधकाम मुदतवाढीकरिता अर्ज करणे अनिवार्य असणार आहे.

========================================================