मद्यपि वाहनचालकांचा बेदरकारपणा वाढतोय

नवी मुंबईत गेल्या वर्षभरात 3269 मद्यपि पोलिसांच्या जाळ्यात

 स्वप्ना हरळकर / AV News bureau

 नवी मुंबई, 9 जानेवारी 17

दारू पिऊन गाडी चालवू नका, अशी कितीही हाकाटी केली तरी मद्यपि वाहनचालाकांचा बेदरकारपणा काही कमी होताना दिसत नाही. गेल्यावर्षभरात तब्बल 3269 मद्यपि वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून ही संख्या आधीच्या वर्षापेक्षा कितीतरी अधिक आहे. ही टक्केवारी 80 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. उंचावणारा हा आलेख पोलिसांसाठी डोकोदुखी ठरत आहे. रस्ते सुरक्षा मोहिम राबविणाऱ्या नवी मुंबई वाहतूक पोलिसांसमोर या मदयपि चालकांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान आहे.

नवी मुंबई शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग सर्वात व्यस्त मार्ग मानला जातो. मुंबई शहराला पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आदी भागाला जोडणारा महामार्ग नवी मुंबईतून जातो. त्यामुळे या महामार्गावर दररोज लाखो वाहने ये जा करीत असतात.

वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे अपघातांचे प्रमाणही चिंताजानक वाढते. मद्यपान करून वाहन चालविण्याच्या वाढत्या प्रकारांमुळेच अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस वेळोवेळी अशा मद्यपि वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करतात. नवी मुंबई वाहतूक सतत अशा मद्यपि वाहनचालकांविरोधात कारवाई करीत असते. मात्र कारवाईनंतरही मद्यपि वाहनचालकांच्या संख्येत घट होत नाही तर वर्षागणिक त्यामध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

नवी मुंबई पोलिसांनी गेल्या दोन वर्षांत मद्यपि वाहनचालकांविरोधात केलेल्या कारवाईचा हा लेखाजोखा –

सन 2015 मधील कारवाई                           

year-2015

     सन 2016 मधील कारवाई                

year-2016

दोन वर्षांंत कारवाईत झालेली वाढ

difference-betn-2015-and-2016