पाण्यासाठी नदी संवर्धन करूयात

  • स्वप्ना हरळकर/  अविरत वाटचाल
  • नवी मुंबई, 29 सप्टेंबर 2023

इतिहासात नदी संस्कृतीला फार महत्व आहे. साधारण प्रत्येक संस्कृती हि नदीकिनारीच वसली गेली आहे. गोड्या पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत असणा-या नद्या जपणे म्हणूनच महत्वाचे आहे.

सध्या राज्यात पाणीटंचाईचा समना करावा लागत आहे. तापमानात झालेल्या वाढीमुळे छोट्या नद्या, ओढे, तलाव आटले आणि पाणी अपुरे पडू लागले आहे. अशावेळी बारमाही वाहणारी नदी कोरडी पडत चाललेली डोळ्यांनी पाहणे खूपच त्रासदायक आहे.

पाऊस मनासाखा पडला तर नद्या, ओढे पुन्हा आपले झरे पाझरतील. हे पाणी मात्र आता साठवण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी विविध पर्याय शोधावे लागतील. पाणी जमिनीत जिरवावे लागेल. काही ठराविक भागांपुरतेच हे काम मर्यादित न राहता किंवा त्यासाठी शासकीय अनुदान, मदत यांवर अवलंबून न राहता लोकचळीचे स्वरूप त्याला आणावे लागेल तेव्हाच हे शक्य आहे.

कोकणातल्या अनेक नद्या या बारमाही आहेत. त्यांचे संवर्धन तर सर्वात जास्त महत्वाचे आहे. या नद्या केवळ मानवासाठीच नव्हे तर सर्व सजीवांना जीवन देतात. डोंगर द-यातून वाहणारे छोटे ओढे, छोट्या नद्या प्रत्येक गावाने या नद्यांमधील पाणी साठवले तरी त्यांची वर्षभराची गोड्या पाण्याची सोय होवू शकते.

हा लेख वाचा : नेत्रदान हेच श्रेष्ठदान; नेत्रदान कोण करू शकते ?

डोंगरात उगम पावणारी प्रत्येक नदी शेवटी समुद्रालाच मिळते. नदीच्या मुखाशी असणारी पाण्याची शुध्दता नदीच्या सागर संगमापर्यंत राहत नाही. याचे कारण निसर्ग नव्हे तर आपण मानवच आहोत. गोड्या पाण्याचा दुरूपयोग करून पाणी प्रदूषित करण्याचे काम आपणच करत आहोत. काही होत नाही म्हणत नदीच्या पात्रात हार, तुरे, सुका कचरा टाकणे हे तर तमाम मानव जामातीचे आद्य कर्तव्य असल्यासारखे आपण वागतो आहोत.

 ही बातमी वाचा : ब्रह्मांडातल्या आवाजाचा शोध

ग्रामीण भागात पाणी फार जपले जात. विहिरींच्या पाण्याला, ओढ्याला देव मानून पूजले जाते कारण त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याचा तोच स्त्रोत असतो त्यामुळे त्याचे संवर्धन करणे महत्वाचे असल्याचे लहानपाणापासूनच मनावर बिंबवले जाते. पण शहरी भागात तसे होत नाही. नळ सुरू केला की पाणी सुरू होते. पाण्याचे पैसे मोजतोय ना मग हवे तसे वापरा हा स्वभाव बनत गेला आहे. त्यामुळे पाण्याची किंमत किंवा गोड्य़ा पाण्याचे महत्व शहरात तेवढे राहिले नसल्यासारखे जाणवते. त्यातही मोठ्या शहरांमध्ये एखादि नदी ही केवळ नकाशातच दिसते. ही नदी होती असे सांगावे लागते.

ही बातमी वाचा : महासागरांचा रंग बदलतोय

जलप्रदूषण आणि आपल्याच अनिश्चेमुळे शहरात नद्यांचे संवर्धन करणे त्यामानाने कठिण मानले जाते. त्याला कारण जलप्रदूषण. नदीचा नाला करताना हीच नदी आपल्याला तापमानवाढीपासून वाचवू शकेल हा विचार आता सर्वसामान्यांवर बिंबवणे महत्वाचे ठरणार आहे.

 गेल्या काही कालावधीपासून शासनाने चला जाणूया नदीला हा उपक्रम सुरू केला आहे. त्यानिमित्ताने का होईना सर्वसामान्यांच्या मनात नदी विषयी पुन्हा जवळीक तयार होवू लागली आहे.

हा लेख वाचा : चंदेरी दुनियेतील तारे : सीमा – रमेश देव

ग्रामीण भागांत किंवा आपल्या गावी गेल्यानंतर गावच्या वेशीपाशी लागणारी नदी, नदीचे पात्र, त्यात केलेली मजा, पोहायला शिकणे हा मागच्या पिढीचा हळवा कोपरा होता. मात्र आताच्या पिढीला नदी शिल्लकच राहिली नाही तर त्यामधली गंमत तरी कशी कळणार. तरणतलावात पोहणे आणि नदीच्या विस्तीर्ण पात्रात पोहोणे यांमधला आनंद पुढच्या पिढीला मिळण्यासाठी आज नदीचे संवर्धन करणे आवश्यक आहे.

ही बातमी वाचा : आठ हजार वर्षांपूर्वीच्या हवामान आणि पर्यावरणीय बदलांचे रहस्य उलगडले

अमर्याद वाळू उपश्यामुळे खोल झालेले नदी पात्र हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. नदीच्या पात्राची खोली आणि रूंदी वाढल्याने पाणी जोराने वाहून पुढे निघून जाते त्यामुळे पाणी जमिनीत मुरत नाही. अनेक गावांमध्ये नदीच्या पात्रात बोअर वेल किंवा विहिरी आहेत. मात्र पाणी जिरत नसल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.

========================================================

========================================================