मुंबई, 8 जानेवारी17/AV News Bureau :
नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात सरकारचा निषेध करण्यासाठी ९ जानेवारी रोजी मुंबईतील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वांद्रे पुर्व येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिली. या विराट मोर्चानंतर पुढच्या कालावधीत मुंबईत जिल्हानिहाय निषेध आंदोलनाचेही आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.