जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून देवेंद्र फडणवीस 5 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना

 

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 21 ऑगस्ट 2023

जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 5 दिवसांच्या जपान दौऱ्यावर रवाना झाले, असून या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपानमधील अनेक वरिष्ठ मंत्र्यांना भेटणार आहेत.

जायकाजेट्रोजेरा यासारख्या अनेक गुंतवणूकदारांच्या ते या दौऱ्यात भेटी घेणार असूनजपान-इंडिया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनाही ते भेटतील. जायकाने राज्यातील अनेक प्रकल्पांना अर्थसहाय्य केले आहे हे राज्यातील गुंतवणुकीसंदर्भात काही कंपन्यांसोबत त्यांच्या बैठकासुद्धा होणार आहेत. जपानमधील बुलेट ट्रेन आणि टोकियो मेट्रो ऑपरेशन्सला या दौऱ्यात ते भेटी देणार आहेत. 20 ते 25 ऑगस्ट या कालावधीत आयोजित या दौऱ्यात वाकायामा या शहरालाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार आहेत.

यापूर्वी केला होता 2015 मध्ये दौरा

यापूर्वी सप्टेंबर 2015 मध्ये फडणवीस यांनी जपानचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात ओसाका प्रांताला भेट दिली होती. जायकासोबत चर्चा केली होती. याकोहामा पोर्टला भेट दिली होती तसेच तेथील अनेक मंत्र्यांशी बैठका झाल्या होत्या.

जायकासोबत विविध प्रकल्पांसाठी झालेल्या चर्चेनंतर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांना जायकाने वित्तपुरवठा केला. यात मुंबई ट्रान्सहार्बर लिंकबुलेट ट्रेनमेट्रो-3, नागपूर नागनदी शुद्धीकरण अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. याच भेटीनंतर 2017 मध्ये जायकासोबत एमटीएचएलसाठी करार झाला होता.

========================================================