घरमालकांनी भाडेकरूंची माहिती सिटीझन पोर्टलवर कळविणे आवश्यक

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 17 जुलै 2023

मुंबई पोलिस आयुक्तांच्या अखत्यारीत येणाऱ्या कोणत्याही घराचामालमत्तेचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक घरमालकजागा मालकांनी कोणत्याही व्यक्तीला राहण्यासाठी जागा भाड्याने दिली आहे किंवा सवलत दिली असेलतर त्या भाडेकरूचा सर्व तपशील www.mumbaipolice.gov.in या सिटीझन पोर्टलवर ऑनलाइन कळवावाअसे पोलिस उपायुक्त (अभियान) विशाल ठाकूर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

भाडेकरूंच्या वेशात दहशतवादीसमाजविरोधी घटकांकडून विध्वंसक कृत्येदंगलभांडण घडू नये म्हणून घरमालकभाडेकरूंची तपासणी आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत. भाडेकरू परदेशी व्यक्ती असेलतर घरमालक व परदेशी व्यक्ती यांनी नावराष्ट्रीयत्वपासपोर्टचा तपशीलव्हीसा क्रमांकश्रेणीठिकाणजारी करण्याची तारीखवैधता नोंदणीचे ठिकाण आणि शहरात राहण्याचे कारण नमूद करणे आवश्यक आहे. हा आदेश ५ सप्टेंबर २०२३ रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहितेनुसार दंडनीय असेलअसेही पोलिस उपायुक्त  ठाकूर यांनी म्हटले आहे.

========================================================

========================================================