- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नागपूर, 18 जून 2023
काँग्रेस नेते माजी आ. डॉ. आशिष देशमुख यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आज नागपुरात झालेल्या जाहीर सभेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.
राहुल गांधींनी ओबीसी समाजाचा अपमान केला आणि न्यायालयात माफी मागण्यास नकार दिला. त्यावेळी डॉ.आशिष देशमुख यांनी न्यायालयात भूमिका मांडली आणि त्याचवेळी आशिष देशमुख यांचा पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात समावेश करण्याचा निर्णय झाला. डॉ. देशमुख यांच्याकडे नेतृत्वगुण आहेत. लोकांना सोबत घेऊन जाण्याची त्यांच्यात क्षमता आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
भाजपाचे धोरण आणि कार्यपद्धती समजून आशिष पुन्हा एकदा भाजपामध्ये दाखल झाले आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरणार असून नागपूर जिल्हा हा भाजपाचाच असल्याचे सिद्ध करण्याची आता वेळ आली आहे. गेल्या 11 महिन्यांत शेतकरी, महिला, युवक, उद्योग अशा सर्व घटकांसाठी युती सरकारद्वारे विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत. तसेच गेल्या 9 वर्षात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशात अनेक विकासाची कामे झाली आहेत, असेही फडणवीस म्हणाले.
========================================================
अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL
========================================================
अविरत वाटचाल वर्तमानपत्र