कॉग्रेसच्या जुईनगर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 14 मे 2023

नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते, कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या जुईनगर येथील जनसंपर्क कार्यालयाचे रविवारी सकाळी नवी मुंबई कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या हस्ते करण्यात आले.
नेरूळ, सानपाडा, जुईनगर नोडमध्ये कॉंग्रेस पक्षसंघटना लोकाभिमुख करण्यासाठी नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष, जिल्हा प्रवक्ते व कामगार नेते रविंद्र सावंत सातत्याने प्रयत्न करत आहेत. पालिका प्रशासनाच्या माध्यमातून नागरी समस्या सोडविताना स्थानिक रहीवाशांना सुविधाही त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. याशिवाय कामगार समस्या सोडविताना त्यांनी मोठ्या प्रमाणावर कामगार प्रवाह कॉंग्रेस पक्षाकडे वळविला आहे. याशिवाय त्यांनी ठिकठिकाणी कॉंग्रेसची जनसंपर्क कार्यालये उघडताना जनता व पक्ष यांच्यात थेट सुसंवाद घडवून आणण्याचे कार्य अनेक वर्ष सावंत यांनी प्रामाणिकपणे केले आहे.


जुईनगर येथील कॉंग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी आपल्या भाषणातून रविंद्र सावंत यांच्या कार्याची प्रशंसा केली. या कार्यक्रमास कॉंग्रेसचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष व नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड, महाराष्ट्र राज्य कॉंग्रेसचे प्रवक्ते नासिर हुसेन, नवी मुंबई ओबीसी सेलचे अध्यक्ष संतोष सुतार, नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर, कल्पेश थोरवडे, संध्या कोकाटे , आबा सोनावणे, महानंद रामराजे , कपूर , गायकवाड , उत्तम पिसाळ ,भानुदास शिंदे, जोशी, संतोष पोळ, रवींद्र साळुंखे, शेलार, तात्या, संजय शिंदे, सुधीर पांचाळ, सुनील जवळ, जितेश तांडेल, राकेश किटे, सुशांत लंबे, सुमित लंबे, सुरज महाबरी, स्वप्निल सोरटे, गौरव महापुरे आदी उपस्थित होते.

========================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

अविरत वाटचाल वर्तमानपत्र