विधान परिषद सदस्य रामनाथ मोते यांचा 5 डिसेंबर 2016 ला कार्यकाल संपल्याने व्दिवार्षिक निवडणुका
नवी मुंबई,6 जानेवारी 17/AV News Bureau :
कोकण शिक्षक मतदार संघांतील विधान परिषद सदस्य आमदार रामनाथ मोते यांचा कार्यकाल 5 डिसेंबर 2016 रोजी संपला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या 3 फेब्रुवारी रोजी व्दिवार्षिक निवडणूक होणार असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागात येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये 4 जानेवारी 2017 पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.यावेळी कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक प्रशांत बुरडे उपस्थित होते.
निवडणूक कार्यक्रम
- 10 जानेवारीला निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार
- 17 जानेवारी नामनिर्देशन सादर करण्याची शेवटची तारीख
- 18 जानेवारी लानामनिर्देशनपत्रांची छाननी
- 20 जानेवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख
- 3 फेब्रुवारी मतदानाची तारीख
- 6 फेब्रुवारी मतमोजणी आणि निकालाची तारीख
मतदारसंघातील जिल्हे
- ठाणे
- रायगड
- रत्नागिरी
- सिंधुदुर्ग
- पालघर
नवीन मतदार यादीनुसार कोकण विभागाताली जिल्हानिहाय मतदार संख्या
- ठाणे – 15736
- पालघर – 5115
- रायगड – 10009
- रत्नागिरी – 4328
- सिंधुदुर्ग – 2456
एकूण – 37644
प्रस्तावित मतदान केंद्र
- ठाणे – 21
- पालघर – 13
- रायगड – 28
- रत्नागिरी – 17
- सिंधुदुर्ग – 19
एकूण – 98
3 फेब्रुवारीला होणाऱ्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक कार्यक्रमाविषयी माहिती देताना कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख.