मुख्य जलवाहिनी फुटल्याने मंगळवार सकाळी ९ वाजेपर्यंत पाणी पुरवठा राहणार बंद
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- ठाणे, 17 एप्रिल 2023
ठाणे शहरास पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी मुंबई-नाशिक महामार्गालगत माणकोली पेट्रोलपंपाजवळ सोमवारी पहाटे ५ वाजता फुटली. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा बंद झाला आहे.
महापालिकेच्या जल विभागातर्फे या जल वाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या दुरुस्तीमुळे मंगळवार, सकाळी ९ वाजेपर्यंत ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहील. तसेच, बुधवारपर्यंत पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
========================================================
अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL
========================================================
अविरत वाटचाल वर्तमानपत्र