दिवाळे गावच्या ‘डीपीएल’ क्रिकेट स्पर्धेत ‘प्रिन्स प्रेम इंडियन्स’ संघांची बाजी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 19 मार्च 2023

एकात्मतेची सांगड घालणारी ‘डीपीएल’ अर्थात दिवाळे प्रीमियर लीग या स्पर्धेच्या ५व्या मोसमाच्या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद ‘प्रिन्स प्रेम इंडियन्स’ संघाने पटकावले आहे.

दिवाळे गावाची मानाची दोन दिवसीय भव्य क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज पार पडला. एकापेक्षा एक असे एकूण ६ संघांमध्ये क्रिकेटचे हे युद्ध रायगड भवन समोरील मैदानात रंगले होते. प्रत्येक संघ  एकमेकांचा पराभव करण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरले होते. या क्रिकेट स्पर्धेचं यंदाचं पाचवं वर्ष असून ‘डीपीएल-2023’ हि स्पर्धा केवळ दिवाळे गावातील स्थानिक खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत डी.जे.ब्लास्ट, प्रिन्स प्रेम इंडियन्स, देव चॅलेंजर्स, लालबाग ओरिअर्स, आराध्य चॅलेंजर्स आणि संस्कार सनराइजर्स हे ६ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेतील सर्व संघाच्या खेळाडूंना स्पर्धेचे बोधचिन्ह असलेले टी शर्टही यावेळी देण्यात आले होते. दोन दिवस अतिशय रंगतदार झालेल्या या स्पर्धेच्या  अखेरच्या सामन्यात डी.जे.ब्लास्ट या संघावर मात करत प्रिन्स प्रेम इंडियन्स संघ डीपीएल २०२३ चा मानकरी ठरला.

या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून  करण जोशी तर  उत्कृष्ट गोलंदाज – वैभव मार्के, उत्कृष्ट फलंदाज विजेंद्र कोळी, विशेष फलंदाज – विकी मुंबईकर, विशेष सन्मानित खेळाडू – परेश कोळी, उत्कृष्ट एमर्जिंग खेळाडू – वरूण कोळी तर सामनावीर वैभव कोळी यांना सन्मानित करण्यात आले. डीपीएल-2023 चा अंतिम सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी गर्दी केली होती.

दरम्यान, गावासाठी क्रिकेट अथवा कोणतेही मैदानी खेळ खेळण्यासाठी गावात हक्काचं ना मैदान ना प्रशिक्षक आहे, मात्र तरीही तरुणांनी आपल्या खेळाडू वृत्तीला अभिमानाची झालर लावून पंचक्रोशीत आपली वेगळी ओळख टिकवून ठेवली आहे. तसेच पुढच्या वर्षी ‘डीपीएल लिग’2024हि प्रकाशझोतात खेळवण्यात येतील असं आयोजकांच्या वतीने पूनम पाटील यांनी सांगितले.

विशेष म्हणजे या क्रिकेट स्पर्धेसाठी स्व: कृष्णा शनिवार कोळी यांच्या स्मरणार्थ सुजित कृष्णा कोळी यांनी ‘डीपीएल’ या मानाच्या पारितोषिकासह पूर्ण ६ संघाच्या खुळाडूंना ट्रॅक पॅन्ट, टीशर्ट आणि टोपी असा संपूर्ण गणवेश देण्यात आला होता यावेळी स्थानिक मा.नगरसेविका भारतीताई कोळी, नवी मुंबई जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा पूनम पाटील, ‘परिवर्तन विद्यार्थी वाहतुकदार सेवाभावी संस्था’चे संस्थापक-अध्यक्ष मिथुन पाटील, दिनेशभाई पुरोहित, निलेश डोंगरे, धीरज कोळी, हृषीकेश घरत, प्रितेश पाठारे, अंकितभाई पटेल आदी उपस्थित होते.

========================================================

  • अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

  • अविरत वाटचाल वर्तमानपत्र