काँग्रेस, एनसीपी व शिवसेनेच्या नेत्यांची संयुक्त बैठकीत निर्धार
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 15 मार्च 2023
केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष सत्तेच्या जोरावर संविधान आणि लोकशाही व्यवस्था मोडीत काढण्याचे काम करत आहे. आज देश मोठ्या अपेक्षेने महाराष्ट्राकडे पहात असून महाराष्ट्राच्या जनतेवर देशाची भिस्त आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राने कायमच देशाला दिली आहे. आता पुन्हा तेच काम होणार आहे. भाजपला सत्तेतून हाकलून देण्याच्या प्रक्रियेची सुरुवात महाराष्ट्रातूनच होईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीची संयक्त बैठक आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री छगन भुजबळ, शेकापचे नेते जयंत पाटील, एकनाथ खडसे, अनिल देशमुख, सुनिल केदार, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, आदित्य ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार यांच्यासह तिन्ही पक्षाचे आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
नाना पटोले पुढे म्हणाले की, सत्तेत जाण्यासाठी नाही तर देशातील लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आहे. राज्यातील सर्व महसुली विभागात महाविकास आघाडीच्या सभा घेण्याचा निर्णय झालेला आहे. मविआच्या या सर्व सभा अतिभव्य झाल्या पाहिजेत. तालुका, जिल्हा पातळीवर सभेची तयारी जोरात करून या सभा यशस्वी करा असे आवाहन पटोले यांनी केले.
माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील, यांनीही बैठकीला संबोधित केले.
======================================================
- अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL
========================================================
- अविरत वाटचाल वर्तमानपत्र