नवी मुंबई विभागाचे वरिष्ठ अधिक्षक डाकघर नितीन येवला यांचे आवाहन
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 7 फेब्रुवारी 2023
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त दि. 09 व 10 फेब्रूवारी 2023 या दोन दिवसात नवी मुंबई पोस्टल डिविजन मार्फत सुकन्या समृध्दी खाते उघडण्याची मोहिम राबविण्यात येत आहे.
भारत सरकारव्दारे राबविण्यात येणारी ‘सुकन्या समृध्दी योजना’ ही दहा वर्ष वयाच्या आतील मुलींच्या उज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी महत्त्वाची योजना आहे. ही योजना “बेटी बचाओ बेटी पढाओ” या मोहिमेचाच एक भाग म्हणून सुरु करण्यात आलेली योजना आहे. आपल्या नजीकच्या पोस्ट कार्यालयात केवळ 250 रुपये भरुन आपल्या मुलीच्या नावाने हे खाते उघडता येते. खाते उघडल्यापासून 21 वर्षा नंतर हे खाते परिपक्व होते. या खात्यात प्रत्येक वर्षी कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीतजास्त 1 लाख 50 हजार इतकी रक्कम जमा करता येऊ शकते. मुलीच्या 18 व्या वर्षी तिच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी जमा रकमेच्या 50 टक्के रक्कम काढता येऊ शकते. या योजनेसाठी 7.6 टक्के इतका आकर्षक व्याजदर आहे.
ही योजना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त 9 व 10 फेब्रूवारी 2023 या दोन दिवसात संपूर्ण देशभरात राबविण्यात येत असून, सर्व पालकांनी या दोन दिवसांत नजीकच्या पोस्ट कार्यालयाला भेट देऊन सुकन्या समृध्दी योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन नवी मुंबई विभागाचे वरिष्ठ अधिक्षक डाकघर नितीन येवला यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
========================================================
- अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL
========================================================
- अविरत वाटचाल वर्तमानपत्र