रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा वार्षिक क्रीडा मेळावा मोठ्या उत्साहात साजरा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • पनवेल, ६ फेब्रुवारी २०२३
खारघर येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा १२ वा वार्षिक क्रीडा मेळावा मोठ्या उत्साहात रविवारी साजरा झाला. या संमेलनाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी झाले.
या मेळाव्यादरम्यान विद्यार्थ्यांन योग आणि पिरॅमिड परफॉर्मन्स सादर करुन मंत्रमुग्ध केले. या क्रीडा मेळाव्यात विद्यार्थ्यांनी १००, २०० आणि ४०० मिटर शर्यत, क्रिकेट, कॉरम, बुद्धीबळ, व्हॉलीबॉल या सारख्या खेळांमध्ये सहभागी होत चमकदार कामगिरी केली. या क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडला.  यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष वाय. टी. देशमुख, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय भाजपनेते प्रभाकर जोशी, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे, विश्वकर्मा ठाकूर, गीता चौधरी, मुख्याध्यापिका राज अलोनी यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
========================================================
  • अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

  • अविरत वाटचाल वर्तमानपत्र