सिडको घरांच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस 21 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 6 जानेवारी 2023  

 सिडको महामंडळाच्या महागृहनिर्माण योजना दिवाळी – 2022 या गृहनिर्माण योजनेस मिळत असलेल्या नागरिकांच्या उदंड प्रतिसादामुळे आणि नागरिकांना केलेल्या मागणीमुळे सदर योजनेकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यास 21 जानेवारी 2023 पर्यंत पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.

या योजनेकरिता अर्ज नोंदणी करण्यास 06 जानेवारी 2023 ही अंतिम तारीख होती. परंतु अधिकाधिक नागरिकांना योजनेकरिता अर्ज करता येणे शक्य होऊन, त्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी योजनेस मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे. या अनुषंगाने अनामत रक्कम व शुल्क भरणा, संगणकीय सोडत या प्रक्रियांनाही मुदतवाढ देण्यात आली आहे.

सुधारित वेळापत्रकाप्रमाणे महागृहनिर्माण योजना दिवाळी – 2022 करीता ऑनलाइन अर्ज नोंदणी 21 जानेवारी 2023 पर्यंत करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज 22 जानेवारी 2023 पर्यंत सादर करता येणार आहेत. ऑनलाइन शुल्क भरणा 24 जानेवारी 2023 पर्यंत करता येणार आहे. स्वीकृत अर्जदारांची प्रारुप यादी 31 जानेवारी 2023 रोजी तर स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादी 03 फेब्रुवारी 2023 रोजी सिडकोच्या https://lottery.cidcoindia.com/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. योजनेची संगणकीय सोडत 08 फेब्रुवारी 2023 रोजी पार पडणार आहे.

=======================================================

  • अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

  • अविरत वाटचाल वर्तमानपत्र