महिला जिल्हासंघटक- सरोज पाटील
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई , 2 डिसेंबर 2022:
नवी मुंबई जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिने सर्व प्रश्न महत्वाचे आहेतच मात्र महिलांच्या प्रश्नांवर अधिक भर देणार असून महिलांचे प्रश्न हाताळणार असल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नवनिर्वाचित जिल्हासंघटक बेलापूर विधानसभा क्षेत्र सरोज रोहिदास पाटील यांनी आज बेलापूर इथे दिली.
बेलापूर इथे पत्रकारांसोबत संवाद मेळाव्यात त्या बोलत होत्या. महिलांच्या आर्थिक समस्या सोडविण्यासाठी महिला सक्षणीकरणावर भर देणार असून त्यादृष्टिने योजनाही आखण्यात आल्या आहेत. अन्याय होणार तिथे दाद मागणार आणि न्यायासाठी लढा देणार असल्याचेही सरोज पाटील यावेळी म्हणाल्या.
बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा वसा घेवून पुढे चालत आहोत. माणसे जोडली जातात तुटली जातात पण विचारधारा कायम असते आणि हिच विचारधारा सोबत घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे मार्गक्रमण करणार असल्याचे पाटील म्हणाल्या.
यावेळी शहर संघटक सुरेखा गव्हाणे, उपजिल्हा संघटक डॉ. स्नेहा देशपांडे, मधुरा पाटील, तेजस्वी कोली, मनिषा गिरप, शितल गायकवाड आदि पदाधिकारी उपस्थित होत्या.
—————————————————————