कन्यादान योजनेंतर्गत 20 हजार अनुदान

मुंबई,5 जानेवारी 2017/ AV News Bureau :

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कन्यादान योजनेद्वारे सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या मागासवर्गीय दांपत्यासाठीच्या अनुदानामध्ये दहा हजार रुपयांवरुन वीस हजार रुपये व स्वयंसेवी संस्थांसाठी दोन हजार रुपयांवरुन चार हजार रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे.

 

सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या मागासवर्गीय दांपत्यांना मिळणाऱ्या अनुदानात करण्यात आलेली वाढ शासन निर्णयानुसार दि. 15 ऑक्टोबर 2016 या दिनांकापासून लागू राहणार आहे.