लसीकरण ही केंद्र सरकारची संविधानिक जबाबदारी

भाजपाने जनतेला फसवू नये- पूनम पाटील

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 29 नोव्हेंबर  2022:

कोरोना महामारीदरम्यान सुरू करण्यात आलेले लसीकरण ही केंद्र सरकारची संविधानिक जबाबदारी होती. तसेच, नागरिकांना स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडर, शौचालय उभारून देणे ही सत्ताधारी सरकारची कर्तव्य आहेत. सत्तारूढ सरकार एकदाच रक्कम या सेवा-सुविधा उभारण्यासाठी खर्च करते त्यामुळे केंद्र सरकारच्या विविध उपक्रमांची उजळणी करवून भाजपने जनतेला भावनाविवश करून, फसवायचे आणि लुटण्याचे उद्योग थांबवावेत असे आवाहन नवी मुंबई महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पूनम मिथुन पाटील यांनी केले आहे.

२८ नोव्हेंबर रोजी भाजपाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विकास मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी महागाईच्या प्रश्नावर सामान्य जनतेला उत्तर कसे द्यायचे, याबाबत मार्गदर्शन केले. वाघ यांच्या या विधानांचा समाचार घेत पूनम पाटील यांनी याप्रकारच्या सेवा-सुविधा सरकारकडून एकदाच उभारून दिल्या जातात. नंतर त्याची देखभाल करण्याची जबाबदारी सरकारची नसते तर लाभार्थ्यांची असते. सातत्याने वाढणाऱ्या स्वयंपाकघरातील सिलेंडर गॅस, पेट्रोल-डिझेल व सिएनजीच्या किंमती ह्या दर महिन्याला जनतेच्या खिशातून सरकार वसुलीरूपाने लुटत आहे. त्यामुळे भाजपाने जनतेला भावनिकरित्या आवाहन करू नये असेही पूनम पाटील यांनी म्हटले आहे.
———————