प्रभाग क्रमांक 22 मध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन

भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांची उपस्थिती

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 28 नोव्हेंबर 2022:

भारतीय संविधान दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक 22 मधील सेक्टर 26 येथे भारतीय संविधान पुस्तिकेला वंदन करून संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी 26/11 या दहशतवादी घटनेतील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, जिल्हा उपाध्यक्ष संकेत डोके, युगपुरुष प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोशन बनसोडे, तुर्भे विभाग अध्यक्ष सुरेश आहिवले, मिडिया सेल अध्यक्ष विनीत मोरे, संतु रॉय,  अरुण चौथमोल, बाजीराव उबाळे, अंकुश आलदर, राहुल गव्हाणे, युवती विभाग अध्यक्ष विद्या पवार,  कांता भानुशाली, दीपक वाडीले, पालिकेचे स्वच्छता कर्मचारी सुपरवायझर अशोक पोस्तुरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

परिसरातील नागरिक तसेच रिक्षा चालक व स्वच्छता दूत यांनीही संविधान उद्देशिका वाचनात सहभाग घेतला.

——————————-