मुंबई,9 नोव्हेंबर 2016/AV News Bureau :
लहान थोरांना आपलेसे वाटणारे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुढच्या वर्षापासून राज्यातल्या 100 महाविद्यालयांमध्ये पुलं महोत्सव सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे, असं सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं.
पु.ल.देशपांडे कला अकादमीतर्फे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या पुलं महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी तावडे बोलत होते.
राज्यातील दिग्गजांच्या मुलाखती रेकॉर्ड करण्याचा कार्यक्रम सरकारने हाती घेतला आहे. जेणेकरून आपल्याकडील सांस्कृतिक ठेवा जतन करता येईल, असेही तावडे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला राजदत्त, किरण शांताराम, अरुण काकडे, पंडित सत्यशील देशपांडे, प्रतिभा मतकरी, कृष्णा बोरकर आदी उपस्थित होते. यावेळी पं. सत्यशिल देशपांडे यांनी पुलंना आवडणाऱ्या बंदिशी सादर केल्या. तसंच पं. वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, प. दीनानाथ मंगेशकर यांच्या मैफिलींमधले किस्सेही सांगण्यात आले.