- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- 21 नोव्हेंबर 2022 :
येत्या 1 डिसेंबर 2022 पासून आठवड्यातून पाच दिवस राष्ट्रपती भवन (Rashtrapati Bhavan) जनतेसाठी खुले राहणार आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार (राजपत्रित सुट्ट्या वगळता) या दिवशी राष्ट्रपती भवनाला भेट देण्यासाठी पाच ठाराविक वेळा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सकाळी 10 ते 11, 11 ते 12, दुपारी 12 ते 1, 2 ते 3 आणि 3 ते 4 या वेळेत भेट देता येणार आहे. तसेच मंगळवार ते रविवार (राजपत्रित सुटी वगळता) आठवड्यातून सहा दिवस राष्ट्रपती भवन संग्रहालय संकुलाला देखील लोकांना भेट देता येईल.
दर शनिवारी, नागरिकांना राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात सकाळी 8 ते 9 या वेळेत चेंज ऑफ गार्ड सोहळा देखील पाहता येईल. राजपत्रित सुट्टी असल्यास किंवा राष्ट्रपती भवनाने तसे सूचित केले असल्यास शनिवारी हा सोहळा होणार नाही. http://rashtrapatisachivalaya.gov.in/rbtour या संकेतस्थळावर हे स्लॉट ऑनलाइन आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
——————————————————————————————–