देशातील पहिल्या खाजगी रॉकेटचे उद्या प्रक्षेपण

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 17 नोव्हेंबर 2022:

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो ) पहिल्यांदाच विक्रम सुबॅर्टिकल रॉकेट या खाजगी रॉकेटचे प्रक्षेपण करणार आहे. उद्या आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा  येथून सकाळी 11 वाजता या रॉकेटचे प्रक्षेपण होणार आहे.

स्कायरूट या पहिल्या स्टार्टअप एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड (एसएपीएल) ने व्‍हीकेएस रॉकेट विकसित केले आहे. रॉकेट लॉन्च करण्यासाठी इस्रोसोबत सामंजस्य करार करणारे स्कायरूट हे पहिले स्टार्टअप आहे. या रॉकेटमुळे स्वस्त दरात उपग्रह प्रक्षेपण सेवा सुरू होण्यास मदत होणार आहे.

 रॉकेटचे वैशिष्ट

    • हे ‘स्टेज स्पिन स्टॅबिलाइज्ड सॉलिड प्रोपेलेंट रॉकेट’  आहे. त्याचे वजन 550 किलोग्रॅम इतके आहे. हे रॉकेट कमाल 101 किलोमीटर उंचीवर जाऊन समुद्रात कोसळते आणि प्रक्षेपणाचा एकूण कालावधी केवळ 300 सेकंद आहे.
    • या रॉकेट प्रक्षेपणा बरोबरच “प्रारंभ” नावाची स्कायरूट एरोस्पेसची पहिली अंतराळ मोहीमही सुरू होणार आहे.
    • यामध्‍ये अंतराळात एकूण तीन पेलोड वाहून नेण्‍यात येतील. या तीनमध्‍ये एका परदेशी ग्राहक संस्थेच्या पेलोडचा समावेश आहे.

——————————————————————————————————