अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, ९ सप्टेंबर २०२२
नवी मुंबईतल्या एनआरआय आ़णि सीवूडस च्या काही भागात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी आज संध्याकाळी फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले.
दुपारी ३.३० च्या सुमारास पामबीच मार्गावरील सिग्नल जवळ असलेला या जलवाहिनीचा मुख्य सांधा फुटला. त्यामुळे काही प्रमाणात पाणी वाहून गेल्याची माहिती करावे गावातील ग्रामस्थ अजित भोईर यांनी दिली.
दरम्यान, जलवाहिनी फुटल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने या वाहिनीवरील पाणी बंद केले. सध्या या जलवाहिनीच्या दुरूस्तीचं काम सुरू असून साधारण तीन ते चार तास लागणार आहेत. मात्र जलवाहिनीच्या दुरूस्तीचं काम पूर्ण झाल्यावर तातडीने या मार्गावरील पाणीपुरवठा सुरळीत सुरू केला जाईल, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
==================================