- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, ३१ ऑक्टोबर २०२२
महाराष्ट्रातील उद्योग शिंदे-फडणवीस सरकारने गुजरातच्या घशात घातल्याचा आरोप करीत या सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ठ्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा एक भाग म्हणून नवी मुंबईत जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्या उपस्थितीत वाशी येथील शिवाजी चौकात उग्र आंदोलन करीत सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या.
शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विरोधी पक्षनेते अजित पवार, खा.सुप्रिया सुळे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख यांच्या आदेशानुसार नवी मुंबई जिल्हा युवक अध्यक्ष किशोर (अन्नू)आंग्रे यांच्या माध्यमातून ३१ ऑक्टोबर रोजी वाशी येथे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या शिंदे फडवणीस सरकारच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.
मागील काळात संपूर्ण भारत देशातून तरुण तरुणी रोजगारासाठी महाराष्ट्रात येत होते. मात्र शिंदे फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठवून महाराष्ट्राला अधोगती कडे नेण्याचे काम करत आहेत, असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला.
या आंदोलन प्रसंगी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत, प्रदेश सरचिटणीस भालचंद्र नलावडे, प्रदेश पदाधिकारी बाळासाहेब बोरकर, नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्ष सलूजा सुतार, कार्याध्यक्ष नवी मुंबई नितीन चव्हाण , माजी नगरसेवक संदीप सुतार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवक पदाधिकारी, तालुका पदाधिकारी व वॉर्ड पदाधिकारी व इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.