नवी मुंबई, ता. 4 जानेवारी 2016/ AV News Bureau:
सानपाडा सोनखार येथील सेक्टर १३ मध्ये ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रातर्फे नववर्षाच्या स्वागतासाठी कौटुंबिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कौटुंबिक मेळाव्याला तीनशेहून अधिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या मेळाव्यात आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धामध्ये व सांप्रदायिक कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने भाग घेतला.
महापालिका प्रशासनाने एप्रिल महिन्यात येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचा ताबा दिला. त्यानंतर परिसरातील सुमारे 165 ज्येष्ठांनी सदसत्व स्वीकारून सभासद नोंदणी केली. त्यापैकी सत्तर सभासदांना ज्येष्ठ नागरिक सवलत कार्ड वाटप करण्यात आले. वृक्षारोपण, भजन, योगा, कॅरम व बुद्धीबळ स्पर्धा तसेच आरोग्य शिबीर केंद्राच्या वतीने राबविण्यात आले. त्याचप्रमाणे पालिकेच्या व ज्येष्ठ नागरिकंच्या फेस्कॉम संस्थेने घेतलेल्या स्पर्धेमध्ये या केंद्राच्या ज्येष्ठ नागरिकांनी आपली चुणूक दाखवली आहे. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या प्रसंगी विरंगुळा केंद्राचे मार्गदर्शक नवी मुंबई कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, ठाणे जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष निशांत भगत, नगरसेविका फाशिबाई भगत, वैजयंती भगत, रुपाली भगत,अध्यक्ष प्रभाकर शिरोळे,उपाध्यक्ष निवृत्ती पवार,जयसिंग सोनवणे,सचिव देवेंद्र खाडे,महादू थोरात,विठ्ठलराव यादव,चंद्रकांत खैरे,फिरोज गोलंदाज आदी मान्यवर उपस्थित होते.