- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, २९ ऑक्टोबर २०२२
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात शहराच्या प्रारुप विकास आराखड्यावर हरकती व सूचना घेण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. याबाबत वाशीगावातील प्रभागासह नवी मुंबईतील नागरिकांना पुनश्च एकदा आवाहन करण्यासाठी जागृतीपर चौकसभा वाशीगावातील स्व. प्रेमनाथ पाटील चौकात चौकसभा घेण्यात आली.
यावेळी आयोजक भाजप नेते दशरथ भगत, संयोजक- निशांत भगत, स्थानिक माजी नगरसेविका फशीबाई भगत, वैजयंती भगत प्रभागातील जेष्ठ नागरिक, युवक, महिला भगिनी, मच्छीमार बांधव, रिक्षाचालक बांधव, फेरीवाले बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.