- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, १५ ऑक्टोबर २०२२
दिवाळीच्या सुट्टीत कोकणात तसेच गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई ते मडगाव आणि मंगळुरुदरम्यान या विशेष गाड्या १६ ऑक्टोबरपासून चालविण्यात येणार आहेत.
- गाडी क्रमांक ०११८७/०११८८ लोकमान्य टिळक टर्मिनस- मडगाव- लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी
-
- गाडी क्रमांक ०११८७/०११८८ लोकमान्य टिळक टर्मिनस- मडगाव ही विशेष साप्ताहिक गाडी १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या काळात दर रविवारी रात्री १०.१५ वाजता एलटीटी स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता मडगावला पोहोचेल.
- गाडी क्रमांक ०११८८ मडगाव- लोकमान्य टिळक टर्मिनस ही विशेष गाडी १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या काळात दर सोमवारी सकाळी ११.३० वाजता मडगावहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.४५ ला एलटीटी स्थानकात पोहोचेल.
-
-
- गाडीचे थांबे
-
या विशेष गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी रेल्वे स्थानकात थांबा देण्यात येणार आहे.
-
-
- डब्यांची रचना
-
या विशेष गाड्यांना १७ डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामध्ये टू टायर एसी १, थ्री टायर एसी ३, स्लीपर ८, सेकंड सिटींग ३ डबे जोडण्यात येणार आहेत. २ डबे सामान आणि बैठकीसाठी असणार आहेत.
-
-
- गाडी क्रमांक ०११८५/०११८६ एलटीटी- मंगळुरू जंक्शन- एलटीटी विशेष साप्ताहिक गाडी
-
- गाडी क्रमांक ०११८५ ही विशेष गाडी २१ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर याकाळात दर शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता एलटीटीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवसी सायंकाली ५.५ वाजता मंगळुरु जंक्शन येथे पोहोचेले.
- गाडी क्रमांक ०११८६ ही विशेष गाडी २२ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर या काळात दर शनिवारी सायंकाळी ६.४५ ला मंगळुरुहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २.२५ ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
-
-
-
-
- गाडीचे थांबे
-
-
-
या विशेष गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण,संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुग्र, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगावस, कारवार, गोकर्ण, कुमठा, मुरुडेश्वर, भतकळ, मुकांबिका रोड, बायंदुर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल या स्थानकांवर थांबा देण्यात येणर आहे.
-
-
-
-
- डब्यांची रचना
-
-
-
या विशेष गाड्यांना १७ डबे जोडण्यात येणार आहेत. यामध्ये टू टायर एसी १, थ्री टायर एसी ३, स्लीपर ८ , सेकंड सिटींग ३ डबे तसेच सामान आणि बैठकीसाठी दोन डबे असणार आहेत.
अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in or download NTES कावे.
-