अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, 15 ऑक्टोबर 2022:
कोरोना महामारीतल्या कमी प्रवाशी संख्येमुळे कोकण रेल्वे महामंडळाला 135 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. मात्र हा तोटा भरून काढण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या वतीने 20-21, 21-22 या दोन्ही आर्थिक वर्षात 235 आणि 145 करोड रूपयांचे कर्ज देण्यात आले आहे. ज्याची परतफेड करायची आहे. कोरोना नंतर आता कोकण रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा सर्व गाड्या धावत असल्याने हे कर्ज लवकरच फेडू शकू असा विश्वास कोकण रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी व्यक्त केला.
कोकण रेल्वेच्या 32 व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने नवी मुंबईतल्या नेरूळ इथल्या कोकण रेल विहार इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कोकण रेल्वेच्या विविध विभागांमध्ये उल्लेखनीय काम करणा-या कर्मचा-यांचा सन्मान करण्यात आला.
कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी गेल्या वर्षभरातील कार्याचा आणि सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. मध्य रेल्वेच्या वतीने कोकण रेल्वे मार्गावर ३२ ट्रेन मिळाल्या आहेत ही कोकण रेल्वेसाठी आनंदाची बाब असल्याचेही गुप्ता यावेळी म्हणाले.
मार्च महिन्यात कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतिकरण पूर्ण झाले आहे. नवीन स्थानकांच्या उभारणीचं कामही पूर्ण झालं आहे त्यामुळे नवीन रेल्वे गाड्याही मार्गावर धावत आहेत. आज दिवसाला २० ते ३० गाड्या विद्युतिकरणावर धावत असून या वर्षी मार्गावरील सर्व गाड्या विद्युतिकरणावर चालतील. यामुळे रेल्वेला ४ हजार ६०० करोड पर्यंत एकूण उत्पन्न मिळू शकेल असही गुप्ता यांनी सांगितलं.
वर्षाच्या शेवटी सर्व प्रवासी गाड्या विद्युत इंजिनावर धावणार
21-22 मध्ये रेल्वे मार्गावरील गाड्यांमुळे 1 हजार 273 करोड रूपयांचा फायदा झाला आहे. याच वर्षाच्या दुस-या टप्यात एकूण उत्पन्नात ५३ टक्के वाढ झाली आहे. कंटेनर वाहतूकीत ८६ टक्के वाढ झाली आहे. क्रॉस ट्राफिक ५० टक्के वाढ झाली आहे. आणि अंदाजे लीडही १० टक्यांनी वाढली आहे. यामुळे या २२- २३ या आर्थिक वर्षात कोकण रेल्वेला चांगला फायदा होईल.
४ एप्रिल २०२१ पासून मालगाडी विद्युत इंजिनावर धावायला सुरूवात झाली. आज ८० ते ९० टक्के मालगाड्या विद्युत इंजिनावर धावत आहेत. आज दर दिवशी २० प्रवासी गाड्याही विद्युत इंजिनावर धावत आहेत. पुढच्या महिन्यात हिच संख्या ४० पर्यंत पोहोचेल आणि या आर्थिक वर्षाच्या शेवटी प्रवासी गाड्या विद्युत इंजिनावर धावणार आहेत. यामुळे कोकण रेल्वेची दर वर्षि दिडशे ते दोनशे करोड रूपयांची बचत होणार आहे.
बाली, रत्नागिरीतून, खेड पासून कंटेनर करंजाडे पासून बॉक्साइट, इंदापूर आणि वेरणातून फर्टिलायझर यांसारख्या नवीन वाहतुकीची वाढ करणे ही प्राथमिकता असणार आहे. तसेच सेंट्रल वेअरहाऊसच्या सहयोगाने १० माल गोदामांवर रेल साइट वेअर हाऊस उभारण्यास यंदा सुरूवात केली जाणार आहेत. पहिल्या टप्यात उडुपी, ठोकूर, वेरणा, इंदापूर इथे माल गोदाम बनवले जातील.
प्रवाशांच्या सोयीसाठीही विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यामध्ये उडुपीत पॉड हॉटेल आणि कोस्टल विभागाच्या सहयोगाने कार्गो एक्सप्रेस चालविली जाणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे संचालन आणि व्यावसायिक संचालक संतोष कुमार झा यांनी यावेळी सांगितले.
——————————————————————————————————