१६ ऑक्टोबर रोजी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, १५ ऑक्टोबर २०२२

रेल्वे मार्गाच्या देखभाल आणि इतर दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेतर्फे येत्या १६ ऑक्टोबर रोजी, रविवारी उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मेन, हार्बर तसेच ट्रान्सहार्बर मार्गावरील  वेळापत्रकांमध्ये बदल होणार आहे.

सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 पर्यंत माटुंगा – ठाणे अप आणि डाउन धिम्या मार्गावर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ या वेळेत  सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे या स्थानकांवर थांबून नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

कल्याण येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.10 पर्यंत  सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा ठाणे ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील, ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबून पुढे माटुंगा येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि   गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने  पोहोचतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत  सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाउन लोकल नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

पनवेल – वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत
(
बेलापूर/नेरुळ-खारकोपर सेवा प्रभावित नाही)

पनवेल येथून सकाळी १०.३३ ते  दुपारी ३.४९ वाजेपर्यंत  सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल करीता  जाणारी ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरूळ आणि खारकोपर दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील.

ब्लॉक कालावधीत ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी भागावर विशेष उपनगरीय गाड्या धावतील.