साखर निर्यातीत भारत जगात दुसरा क्रमांकावर

आतापर्यंतची सर्वाधिक 109.8 एलएमटी साखरेची विक्रमी निर्यात

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 5 ऑक्टोबर 2022:

ऑक्टोबर- सप्टेंबर 2021-22 या साखर हंगामात आत्तापर्यंतची सर्वाधिक म्हणजे सुमारे 109.8 एलएमटी इतकी विक्रमी साखर निर्यात झाली. या निर्यातीतून देशासाठी 40,000 कोटी रुपयांचे परकीय चलन प्राप्त झाले. त्याचसोबत भारत साखर निर्यात करणारा जगातील दुस-या क्रमांकाचा देश ठरला आहे.

 याच हंगामात देशात 5000 लाख मेट्रिक टन पेक्षा जास्त उसाचे विक्रमी उत्पादन झाले. त्यापैकी सुमारे 3574 एलएमटी  उसाचे गाळप साखर कारखान्यांनी केले आणि सुमारे 394 एलएमटी सुक्रोजचे किंवा नैसर्गिक साखरेचे उत्पादन घेतले. यापैकी 35 एलएमटी साखर इथेनॉल उत्पादनासाठी वळवण्यात आली आणि साखर कारखान्यांकडून  359 एलएमटी साखर तयार करण्यात आली. यामुळे  भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि सर्वाधिक ग्राहक असलेला देश ठरला आहे.

साखर हंगाम  2021-22 दरम्यान, साखर कारखान्यांनी 1.18 लाख कोटींहून अधिक किमतीचा ऊस खरेदी केला आणि भारत सरकारकडून कोणतेही आर्थिक सहाय्य (अनुदान) न घेता  1.12 लाख कोटींहून अधिक पैसे चुकते  केले.

इथेनॉलच्या विक्रीतून 2021-22 मध्ये साखर कारखानदार/डिस्टिलरींनी सुमारे  18,000 कोटी रुपयांचा  महसूल कमावला. यामुळे  शेतकऱ्यांची उसाची थकबाकी लवकरात लवकर देण्यात मोठी मदत झाली आहे. उसाची मळी /साखर-आधारित डिस्टिलरीजची इथेनॉल उत्पादन क्षमता वर्षाला  605 कोटी लिटरपर्यंत वाढली आहे.

——————————————————————————————————