तुर्भे स्टोअर येथे व्यसनमुक्ती रॅली

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, १ ऑक्टोबर २०२२

महात्मा गांधी जयंती सप्ताहानिमित्त अन्वय प्रतिष्ठान, वाशी, डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय शाळा क्रमांक १११ व २२ व तुर्भे पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने तुर्भे स्टोअर, के के रोड या मार्गे नशा मुक्ती रॅलीचं आयोजन केलं होतं.

शाळेची  मुलं व्यसनमुक्तीचा नारा देत व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश पोहोचवत होती. ‘शराब करती है सबको खराब’, ‘नशा करी जीवनाची दुर्दशा, ‘तुमच्या कुटुंबासाठी नशा सोडा, नशा सोडा’, नशा भगाओ, तुर्भे स्टोअर बचाओ, ७ वी ८वी ९वी १० वीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी घोषणा देत नशामुक्तीविरोधात जनजागृती केली.

रॅली संपल्यानंतर आयसीएल मोतीलाल झुनझुनवाला कॉलेजच्या मुलांचा सिद्धेश पवार दिग्दर्शित एक धमाकेदार पथनाट्य झाले.

या रॅलीत सामाजिक कार्यकर्ते वृषाली मगदूम, अनिल लाड,  जीवन निकम,  नयन म्हात्रे  शीतल सारंग, डॉ अजित मगदूम, पोलीस अधिकारी मनोज पाटील व त्यांची टीम, शाळाप्रमुख सुरज मगर, प्राथमिकच्या प्रमुख विद्या कठारे, समुपदेशक, शिक्षकवृंद विजय संखे, विजय बेबले,  सारिका खोत इत्यादी सहभागी झाले होते.