मध्य रेल्वेचा १८ सप्टेंबर रोजी मेगाब्लॉक

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, १७ सप्टेंबर २०२२

रेल्वे मार्गाचे देखभाल आणि दुरूस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वेने १८ सप्टेंबर रोजी मेगा ब्लॉक जाहीर केला आहे.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या ट्रे्न्स भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे पुन्हा डाउन मार्गावर वळवल्या जातील.

घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ पर्यंत  सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.

ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत

ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ वाजेपर्यंत  वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरुळ/पनवेल येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी ४.०९ वाजेपर्यंत ठाणे करीता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत हार्बर/मेन मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी असेल.