- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 25 ऑगस्ट 2022
गणपती उत्सवसाठी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेतर्फे पनवेल आणि मडगाव / रत्नागिरी दरम्यान 12 अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवणार आहे. मध्य रेल्वेने आधीच 218 गणपती विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आतापर्यंत गणपती विशेष गाड्यांची संख्या 230 झाली आहे.
1. पनवेल – मडगाव गणपती विशेष
- 01595 साप्ताहिक विशेष गाडी 4 सप्टेंबर आणि 11 सप्टेंबर या दिवशी पनवेल येथून सायंकाळी 4.45 वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता पोहोचेल.
- 01596 साप्ताहिक विशेष गाडी 2 सप्टेंबर आणि 9 सप्टेंबर रोजी मडगाव येथून दुपारी 3 वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसर्या दिवशी सकाळी 5.10 वाजता पोहोचेल.
गाडीचे थांबे
रोहा, माणगाव, वीर, सापे वामणे, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमळी.
- पनवेल- रत्नागिरी गणपती विशेष
-
- 01591 साप्ताहिक विशेष पनवेल 3 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर रोजी सकाळी 5.40 वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी सकाळी 11.45 वाजता पोहोचेल.
- 01592 साप्ताहिक विशेष गाडी रत्नागिरी येथून 3 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर रोजी दुपारी 3.5 वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी रात्री 10.55 वाजता पोहोचेल.
3. पनवेल – रत्नागिरी गणपती विशेष
-
-
- 01593 साप्ताहिक विशेष गाडी पनवेल येथून 4 सप्टेंबर आणि 11 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 1.30 वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी सकाळी 7.30वाजता पोहोचेल.
- 01594 साप्ताहिक विशेष गाडी रत्नागिरी येथून 4 सप्टेंबर आणि 11 सप्टेंबर रोजी 8.20 वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी 3.20 वाजता पोहोचेल.
-
01591/01592 आणि 01593/01594 साठी थांबे:
रोहा, माणगाव, वीर, सापे वामणे, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.
-
-
- सर्व गाड्यांची संरचना
-
18 द्वितीय श्रेणी आसन, 1 द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन.
-
-
- आरक्षण
-
वरील सर्व विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग 25 ऑगस्टपासून पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.