- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 19 ऑगस्ट 2022
विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे आपल्या उपनगरीय विभागांवर 20 ऑगस्ट आणि 21 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
भायखळा – माटुंगा अप आणि डाउन जलद मार्गावर
- 20 ऑगस्ट रोजी रात्री 11.30 ते 21 ऑगस्ट रोजी पहाटे 4.30 पर्यंत जलद मार्गावर
- 21 ऑगस्ट रोजी सकाळी 12.40 ते 5.40 पर्यंत डाउन जलद मार्गावर
21 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 5.20 वाजता सुटणारी डाउन जलद मार्गावरील लोकल भायखळा आणि माटुंगा दरम्यानच्या धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि ती नियोजित थांब्यांवर थांबून गंतव्यस्थानी 10 मिनिटे उशिरा पोहोचेल.
ठाणे येथून 20 ऑगस्ट रोजी रात्री 10.58 आणि 11.15 वाजता सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि भायखळा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील, त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार थांबतील आणि निर्धारित वेळेच्या 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
- मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्शन
12051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. दादर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 येथे या गाडीला दुहेरी थांबा दिला जाईल आणि रोहा येथे 10 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचेल.
11058 अमृतसर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस,
11020 भुवनेश्वर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस आणि
12810 हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर मार्गे मेल, माटुंगा आणि भायखळा
स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्यांना दादर प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर दोनदा थांबा दिला जाईल आणि गंतव्यस्थानी 10 ते 15 मिनिटे उशीराने पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत पनवेल – कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) विभागात विशेष लोकल अंदाजे 20 मिनिटांच्या वारंवारतेने धावतील.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मेन लाइनआणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी असेल.