रक्षाबंधनसाठी एनएमएमटीची विशेष बस सेवा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 10  ऑगस्ट  2022

11 ऑगस्ट 2022 रोजी रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने इतर नियमित मार्गावर प्रवाशांच्या सेवेकरिता जादा बसेसची व्यवस्था उपक्रमाने केलेली आहे.

दरम्यान,11 ऑगस्ट रोजी “नारळी पौर्णिमा”सणानिमित्त ठाणे शहरात कळवा खाडीवरील पूल परिसर ( कोर्ट ते क्रिक नाका व छ्त्रपती शिवाजी महाराज शिवाजी चौक) तसेच जुना कळवा खाडी पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे. त्या अनुषंगाने ठाणे सिडको बस स्थानकाकडे जाणारे एनएमएमटीचे बसमार्ग क्र. 01, 03, 04, 07, 08, 11, 12, 24, 26, 27 या मार्गावरील बससेवा 10.00 वाजल्यानंतर “मुकंद कंपनी (पटनी नाका)” पर्यंत सिमित करण्यात येणार आहेत. तसेच बसमार्ग क्र. 02, 05 व 86 या मार्गावरील बसेसवा 11.00 वाजल्यानंतर बंद करण्यात येत आहेत.

11 ऑगस्ट 2022 रोजी रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने इतर नियमित मार्गावर प्रवाशांच्या सेवेकरिता जादा बसेसची व्यवस्था उपक्रमाने केलेली आहे त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. मार्ग क्र. मार्गाचे नांव बस संख्या

मार्ग क्र. 17 – नेरुळ रेल्वे स्थानक (पु) ते बामणडोंगरी रेल्वे स्थानक 4

मार्ग क्र. 23 – सिबीडी आर्टिस्ट कॉलनी से.08 ते खारकोपर रेल्वे स्थानक 4

मार्ग क्र. 31 – कोपरखैरणे बस स्थानक ते उरण 5

मार्ग क्र. 42 – वाशी रेल्वे स्थानक ते डोंबिवली 2

मार्ग क्र. 48 – बेलापूर रेल्वे स्थानक ते वाशिवली गाव/रसायनी 3

मार्ग क्र. 49 – बेलापूर रेल्वे स्थानक ते कर्जत 3

मार्ग क्र. 50 – कोपरखैरणे बस स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानक 2

मार्ग क्र. 58 – बेलापूर रेल्वे स्थानक ते खोपोली 2

मार्ग क्र. 62 – वाशी रेल्वे स्थानक ते कल्याण रेल्वे स्थानक 3

मार्ग क्र. 66 – घणसोली रेल्वे स्थानक ते कल्याण रेल्वे स्थानक 2

मार्ग क्र. 82 – वाशी रेल्वे स्थानक ते दिवा रेल्वे स्थानक 3

तरी सदर बस सेवेचा लाभ सर्व प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत करण्यात येत आहे.