- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- पेण, 15 जुलै 2022
आगरी समाजाचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करणाऱ्या आणि देशभरातील समस्त आगरी समाजाची संघटित शक्ती उभी करुन समाजाचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय बाळगलेल्या अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सूर्यकांत पाटील यांची सर्वसंमतीने नुकतीच फेरनिवड करण्यात आली. सन २०२२ ते २०२७ या पाच वर्षांकरिता ही निवड करण्यात आली आहे.
समाजाची नस ओळखणारा, समाजाच्या मूलभूत प्रश्नांचा गाडा अभ्यास असलेला, येऊ घातलेल्या नव्या आव्हानांचा वेध घेणारा, समाजाच्या समस्यांविरुध्द सतत झगडण्याचा वसा घेतलेला लढवय्या नेता म्हणून आज सारा आगरी समाज त्यांच्याकडे पहात आहे. म्हणूनच समाजाच्या नेतृत्वाची धुरा त्यांच्या हाती पुन्हा सोपविण्यात आली आहे.
नव्या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी डॉ. सिध्दार्थ अंबाजी पाटील – मुंबई, नलिनी सुरेश पाटील – ठाणे तर कार्याध्यक्षपदी संजय गणेश ठाकूर – पेण तसेच सरचिटणीसपदी धनाजी रामभाऊ घरत – पेण, सहचिटणीसपदी अॅड. निलेश मोतीराम पाटील – पनवेल, नरेंद्र रघुनाथ म्हात्रे – मुलुंड आणि खजिनदार पदी पांडुरंग यशवंत पाटील – पेण, सहखजिनदारपदी रवींद्र कृष्णाजी म्हात्रे – पेण त्याचप्रमाणे कार्यकारिणी सदस्य म्हणून जनार्दन कचरु माळी – ईगतपुरी, कल्पना राजीव टेमकर – नागोठणे, गजानन धर्मा म्हात्रे – नवी मुंबई, आल्हाद वासुदेव पाटील – पनवेल, संतोष मोतीराम पेरणे – कर्जत, राजेंद्र गजानन वाघ – अलिबाग यांची निवड करण्यात आली आहे.
- =====================================================
मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप