कोपरखैरणेतून तीन पिस्तुले जप्त,एकास अटक

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 15 जुलै 2022

कोपरखैरणे एनएमटी बस डेपोच्या समोरील माथाडी हॉस्पीटलच्या बाजुस असलेल्या गल्लीत एका व्यक्तीला ताब्यात घेवून त्याच्याकडून एकूण तीन पिस्तुले जप्त करण्यात आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

८ जुलै रोजी पोलीस उपनिरीक्षक धुमाळ यांना त्यांच्या बातमीदाराने माहिती दिली की, एक इसम तीन टाकी चौक, माथाडी हॉस्पीटल, कोपरखैरणे सेक्टर ६ नवी मुंबई येथे पिस्तुलासह येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रदीप तिदार यांनी लागलीच दोन वेगवेगळे पथके तयार करून सापळा रचला. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार कोपरखैरणे एनएमटी बस डेपोच्या समोरील माथाडी हॉस्पीटलच्या बाजुस असलेल्या गल्लीतुन येणाऱ्या इसमास ताब्यात घेवुन त्याच्याकडुन डाव्या बाजुस कमरेजवळ खोवलेले एक रिव्हॉल्वर हस्तगत केले. या आरोपीचे नाव ऋषिकेश रणजित जायभाये उर्फ बाबु उर्फ बाब्या (२५) असून तो कोपरखैरणे येथे राहणारा आहे. अधिक  चौकशीत त्याच्याकडून आणखी दोन पिस्तुले व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेली आहे.

 

आरोपीकडून हस्तगत मालमत्ता

१) एक देशी बनावटीचे रिव्हॉल्वर (सिक्सर)

२) दोन देशी बनावटीचे पिस्तुल

३) सुझुकी ॲक्सेस मोटार सायकल

सदर आरोपीविरूध्द कोपरखैरणे पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्र. ३१६/२०२२ कलम ३, २५ शस्त्र अधिनियम १९५९, सह कलम ३७(१), १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरूध्द कोपरखैरणे पोलीस ठाणे येथे यापुर्वी तीन गुन्हे दाखल आहेत. आरोपीला १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी असुन पुढील तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सदर गुन्हयाचा तपास पोलीस आयुक्त  बिपीनकुमार सिंह सहपोलीस आयुक्त जय जाधव, परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त डी. डी.टेळे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार, पोलीस निरीक्षक गजानन कदम व गुन्हे प्रकटिकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक सागर धुमाळ, पोना/१८०२ राकेश पाटील, पोना/१७३७ योगेश डोंगरे, पोशि/१२१३४ गणेश गिते, पोशि/१२३४३ निलेश निकम, पोशि/१२३४२ अनिल बिहाडे, पोशि/ ३२३४ सचिन दळवी, पोशि/३७६० दोंदे, पोशि/२७३० हमरे यांनी अविरत मेहनत घेवुन आरोपीकडुन तीन पिस्तुल हस्तगत करण्याची कामगिरी केली आहे.

=======================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप