मुंबई ते ठोकूरदरम्यान गाडया चालविणार
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 8 जुलै 2022
गणपती उत्सवदरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस आणि ठोकूर (कर्नाटक) दरम्यान अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवणार आहेत.
तपशील खालीलप्रमाणे
- 01153 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर (30 सेवा) पर्यंत दररोज रात्री 10.15 वाजता सुटेल आणि ठोकूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 4.30 वाजता पोहोचेल.
- 01154 विशेष 14 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर (30 सेवा) दरम्यान ठोकूर येथून दररोज सायंकाळी 7.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 1.25 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा, मुरुडेश्वर, भटकळ, मूकांबिका रोड बैन्दूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, सुरतकल.
डब्यांची रचनाः एक द्वितीय वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित, 12 शयनयान, 2 लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह 7 सामान्य द्वितीय श्रेणी.
आरक्षण: विशेष गाडी क्र. 01153/01154 चे विशेष शुल्कासह बुकिंग 9 सप्टेंबरपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरु होईल.
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
===============================================
- मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप