शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 8 जुलै 2022:
शिवसेना पक्षाचं चिन्ह असलेले धनुष्यबाण कायद्याच्या दृष्टीने कुणी हिरावून घेऊ शकत नाही कायदेतज्ज्ञांशी बोलल्यानंतरच हे सागतो आहे असं शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. मतदान पत्रिकेवरचं चिन्ह महत्वाचं असते. मतदान करताना लोक धनुष्यबाण चिन्ह असलेल्या माणसाचीही चिन्ह बघतात आणि मतदानात विचार करतात. नवीन चिन्हाचा विचार करण्याची गरज नाही. धनुष्यबाण कुणी दूर करु शकत नाही. धनुष्यबाण हे शिवसेनेचेच राहील असं ठाकरे म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मातोश्री या आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेवून अनेक मुद्यांवर आपलं मत व्यक्त केले. माझ्या शिवसैनिकांवरचं दडपण कमी करणं हे माझं काम असल्याचं ते यावेळी म्हणाले. एक दोन दिवसांनी आषाढी एकादशी आहे. काही जण आज उद्याच दर्शन घेतील. मला वारक-यांच आमंत्रण आलं आहे. मी मात्र नंतर जाऊन नक्कीच दर्शन घेईन.
मोठे करणारे शिवसैनिक शिवसेनेसोबत
राज्यातील बहुतांश महापालिकांवर प्रशासकाची नेमणूक झाली आहे. महापालिका अस्तित्वात नाही त्यामुळे नगरसेवक नाहीत. आता जे त्यांच्यासोबत जात असतील ते त्यांचे समर्थक असतील. निष्ठावन शिवसैनिकांऐवजी यांच्या शिफारशीवर त्यांना उमेदवारी दिली होती. ते गेले, आजही एका गोष्टिचा अभिमान साधे साधे शिवसैनिक येतायत. शिवसेनेने आजवर साध्या माणसाला मोठे केले ह्याचा अभिमान आहे. यांच्यामुळे ज्यांना मोठेपण मिळाले ते गेले. मोठे केले ती माणसे आजही शिवसेनेसोबत आहेत.
गेले ८-१० दिवस मातोश्रीला लोंढे येतायत. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रु आहेत., शिवसेनाप्रमुखांचे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवण्यासारखं आहे. ते म्हणायचे माशांच्या डोळ्यातले अश्रु कुणाला दिसत नाही.
आमदार निघून गेल्यावर पक्ष संपत नाही. आमदार जाऊ शकतात पक्ष नाही. लोकांच्या मनात भ्रम तयार केला जात आहे. तुम्ही भ्रमात जाऊ नका विधीमंडळ पक्ष वेगळा असतो आणि रजिस्टर पक्ष वेगळा असतो असंही ठाकरे यावेळी म्हणाले.
दिशा देणारा निकाल असेल
जे सोबत राहिलेत त्या आमदारांचे जाहीर कौतुक आहे. काही झाले तरी ते हटले नाहीत. अजूनही देशात असत्यमेव जयते नसून सत्यमेव जयते हे वाक्य आहे. येत्या 12 जुलै रोजी होणारी सुनावणी हि देशात लोकशाहीचे अस्तित्व कितीकाळ टिकणार आहे. 12 जुलै रोजी होणारी सुनावणी हि देशात लोकशाहीच अस्तित्व कितीकाळ टिकणार आहे.राज्य घटना नुसार कारभार होणार आहे कि नाही असा दिशा देणारा निकाल असेल. कारण माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. देशात लोकशाहीचे भविष्य किती शिल्लक आहे हे स्पष्ट होईल. राज्य घटना नुसार कारभार होणार आहे कि नाही असा दिशा देणारा निकाल असेल.
विधानसभेची निवडणुक व्हावी
मातोश्रीने सन्माने बोलावले तर आम्ही जाऊ असे म्हणाले. त्यांना आजही सांगतो सुरतेला जावून बोलण्यापेक्षा सूरत दाखवून बोलला असतात तर बरं झालं असतं. त्यांना आजही मातोश्री बद्दल प्रेम आहे त्यासाठी जाहीर धन्यवाद. आज ज्यांच्याकडे गेलात ते ठाकरे कुटुंबियांच्या बद्दल बोलले. तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात. अश्या लोकांच्या सोबत तुम्ही स्वागत स्वीकारताहेत. हे जनतेला कळू द्या. पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी काही दिवसात चर्चा करुन निर्णय घेईन. असे खेळ खेळत बसण्यापेक्षा विधानसभेची निवडणुक घ्या. आम्ही चूक असू तर शिक्षा मिळेल. आम्हि घरी बसू आणि ते चुकले असतील तर जनता त्यांच्याबाबत निर्णय घेईल तो मान्य असल्याचं उध्दव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
——————————————————————————————-