प्रातिनिधिक फोटो
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 15 मे 2022
मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) शासकीय रेल्वे पोलीस (GRP) मध्य रेल्वेतील रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरील रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयाने “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत गेल्या 4 महिन्यांत म्हणजे जानेवारी ते एप्रिल-2022 या कालावधीत 504 मुलांची सुटका केली आहे. यामध्ये 330 मुले आणि 174 मुलींचा समावेश आहे.चाइल्डलाइनसारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांचे पालकांशी पुनर्मिलन झाले आहे.
काही मुले भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगल्या आयुष्याच्या किंवा शहरातील ग्लॅमरच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्टेशनवर येणारी ही मुले प्रशिक्षित आरपीएफ कर्मचार्यांना सापडतात. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात.
मध्य रेल्वेवर जानेवारी ते एप्रिल 2022 पर्यंत सुटका केलेल्या मुलांचे विभागनिहाय विभाजन
- मध्य रेल्वेचा मुंबई विभाग
2022 मध्ये जानेवारी ते एप्रिल या कालावधीत बालकांच्या सुटकेची सर्वाधिक 285 प्रकरणे नोंदवली गेली, ज्यात 206 मुले आणि 79 मुलींचा समावेश आहे.
पुणे विभागात 50 मुले आणि 21 मुलींचा समावेश असलेल्या 71 मुलांची सुटका प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. भुसावळ विभागात बालकांच्या सुटकेच्या 92 गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यात 47 मुले आणि 45 मुलींचा समावेश आहे
- नागपूर विभाग
बालकांच्या सुटकेच्या 32 प्रकरणांची नोंद झाली असून त्यात 12 मुले आणि 20 मुलींचा समावेश आहे.
- सोलापूर विभाग
बालकांच्या सुटकेच्या 24 गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यात 15 मुले आणि 9 मुलींचा समावेश आहे
गेल्या वर्षी म्हणजे 2011 च्या जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मध्य रेल्वे आरपीएफ ने शासकीय रेल्वे पोलीस (GRP) आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने 603 मुले आणि 368 मुलींसह एकूण 971 मुलांची सुटका केली आहे.
रेल्वेने अलीकडेच असोसिएशन फॉर व्हॉलंटरी ॲक्शन (AVA) सोबत देशातील रेल्वेमार्गे होणारी मानवी तस्करी समाप्त करण्याच्या प्रकल्पावर काम करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. ही संघटना ‘बचपन बचाओ’ आंदोलन म्हणूनही ओळखली जाते, जी नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या चिल्ड्रन फाऊंडेशनशी संबंधित आहे.
आरपीएफ ने “ऑपरेशन AAHT” (Action Against Human Trafficking- मानवी तस्करी विरुद्ध कृती) सुरु केले आहे आणि रेल्वेद्वारे मानवी तस्करी विरुद्ध कठोर कारवाई केली आहे. तसेच संभाव्य मानवी तस्करीच्या बळींना तस्करांच्या तावडीतून सोडवत आहे.
===================================================
- मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप