नवी मुंबईतील कलागुणसंपन्न महिलांचा विशेष सन्मान

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांच्याहस्ते गौरव

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 12 मार्च 2022

जागतिक महिला दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने विविध स्पर्धात्मक उपक्रमांचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या अंगभूत कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या 9 विविध प्रकारच्या स्पर्धांना चांगला प्रतिसाद लाभला. या स्पर्धेतील यशस्वी महिलांचा नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रशासन व समाजविकास विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार आणि इतर मान्यवरांच्या शुभहस्ते स्पर्धा विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

9 विविध स्पर्धांमध्ये 369 महिलांनी सहभागी होत आपल्या ऑनलाईन कलाकृती सादर केल्या. यामध्ये गायन स्पर्धेत मोनाली देव यांनी सर्वप्रथम क्रमांकाचे तसेच ज्योती वाटवे व संगमेश्वरी मोरे यांनी व्दितीय व तृतीय क्रमाकाचे पारितोषिक पटकाविले. पौर्णिमा चव्हाण यांनी स्पर्धा परीक्षण केले.

सलाट सजावट स्पर्धेमध्ये मयुरी तांडेल, संचिता पाटील, प्रभापंत यांनी अनुक्रमे तीन क्रमांकाची पारितोषिके संपादन केली. अमर चौव्हान यांनी स्पर्धा परीक्षण केले.

टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे स्पर्धेमध्ये चित्रा जाधव व मिनल म्हात्रे या परीक्षकांनी मोनाली भास्कर हिची प्रथम क्रमांकासाठी तसेच स्वाती पाटील व हर्षाली रानकर यांची व्दितीय व तृतीय क्रमांकासाठी निवड केली.

नवी मुंबई हास्यसम्राज्ञी स्पर्धेत डी महेश यांनी परीक्षण करून तन्वी हिंदळेकर यांची प्रथम क्रमांकासाठी निवड केली. तसेच स्वाती शिवशरण यांना व्दितीय आणि संस्कृती पाटील यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले.

21व्या शतकातील स्त्री समोरील आव्हाने या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत   प्रतिभा प्रविण कुमार यांना प्रथम क्रमांकाचे त्याचप्रमाणे अंजली गवळी यांना व्दितीय तसेच मयुरी हरड यांना तृतीय क्रमांकाची पारितोषिक प्रदान करण्यात आली.

शहर स्वच्छतेत माझा सहभाग या विषयावरील निबंध स्पर्धेत राजश्री पाटील, आरती आचर, स्मिता भालेराव यांच्या निबंधांची अनुक्रमे तीन क्रमांकासाठी निवड केली.

रांगोळी स्पर्धेमध्ये मिताली सुर्वे यांना प्रथम क्रमांकाने तसेच प्रिया विश्वासराव आणि अदिती गोवेकर यांना व्दितीय व तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले.

आमची बाग स्पर्धा (किचन गार्डन) यामध्ये सायली आनंद शिंदे यांचे किचन गार्डन प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरल्या. मोनिका आंग्रे यांच्या किचन गार्डनची व्दितीय क्रमांकासाठी आणि राशी महाडीक यांच्या किचन गार्डनची तृतीय क्रमांकासाठी निवड केली.

नृत्य स्पर्धेमध्ये साक्षी वडजे हिचा नृत्यविष्कार प्रथम क्रमांकाचा तसेच ऋतुजा रहाटे यांचे सादरीकरण व्दितीय क्रमांकाचे व कांचन यमगर यांचे नृत्य तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले. सर्व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले.

या प्रसंगी बोलताना प्रशासन व समाजविकास विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या महिला व बालकल्याणकारी योजनांची माहिती देत यापुढील काळात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून नवीन योजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले.

================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप