दहावी परीक्षेचे ऑनलाइन आवेनदपत्र भरण्यासाठी 14 मार्च शेवटची तारीख

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे,8 मार्च 2022

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल 2022 मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरु होत आहेत. या परीक्षेचे आवेदनपत्र नियमित शुल्कासह ऑनलाईन 14 मार्च रोजी सकाळी 11 वाजेपर्यंतच भरण्याची सुविधा उपलब्ध राहील, तद्नंतर आवेदनपत्र भरणेसाठी संकेतस्थळ बंद करण्यात येणार आहे.

मार्च-एप्रिल 2022 इयत्ता 10 वी परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी खाजगी विद्यार्थी म्हणून नाव नोंदणीसाठी अर्ज केलेल्या परंतु प्रस्तावामध्ये त्रुटी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी 10 मार्चपर्यंत त्रुटींची पूर्तता करून 12 मार्चपर्यंत नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. तसेच वरील मुदतीत परीक्षेचे आवेदनपत्र भरावेअसे राज्य मंडळाचे सचिवग्रंथ मंडळ, अशोक भोसले यांनी कळविले आहे.

========================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप