भावे नाट्यगृहात यशवंत भिमराव आंबेडकर यांची जयंती साजरी

रिपब्लिकन सेनेचे  जिल्हाध्यक्ष खाजामिया पटेल यांच्या नेतृत्वाखाली संपन्न 

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 22 डिसेंबर 2021

सुर्यपुत्र, चैत्यभूमीचे जनक भैय्यासाहेब तथा यशवंत भिमराव आंबेडकर यांची जयंती वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात नुकतीच साजरी करण्यात आली. रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष ख्वाजामिया पटेल यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू यशवंतराव आंबेडकर यांचे पुत्र भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष भिमराव यशवंतराव आंबेडकर उपस्थित होते. भैय्यासाहेब तथा यशवंत भिमराव आंबेडकर यांच्या  जयंतीनिमित्त उदान शाहिरी जलसा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शाहिर बाबासाहेब आटखिळे, विशाल पारदे, गोपाळ गंगावणे, आकाश पवार यांनी भिम गितांबरोबरच समाज प्रबोधन करणारी अनेक गीते सादर केली. भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भैय्यासाहेब यांचे पुत्र भिमराव यशवंतराव आंबेडकर यांना नवी मुंबई बोलावण्याचे कारण म्हणजे आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच भैय्यासाहेब आंबेडकर यांना पाहून शिकलो नाही. पण भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या रूपाने आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जवळून पाहिल्याची अनुभूती आली, अशी भावना खाजामिया पटेल यांनी व्यक्त केली.

===============================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप